रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार
“आज शाळेत जायचं म्हणून रडतो आहेस, उद्या शाळेत जाणार नाही म्हणून यापेक्षा जास्त रडशील.” रवींद्रनाथांच्या लहानपणी त्यांच्या घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना एक थप्पड मारून ही जी भविष्यवाणी उच्चारली तीच त्यांच्या शिक्षणविषयक अनुभवांतील पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथांचा भाऊ सोमेंद्रनाथ आणि भाचा सत्यप्रसाद हे त्यांच्यापेक्षा केवळ दोनच वर्षांनी मोठे. त्यामुळे ही तीनही मुले …